उस्मानाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 
crime

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका गावातील एक 14 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 02.03.2022 रोजी सायंकाळी 18.00 वा. सु. घराजवळील शेतात शौचास गेली होती. यावेळी गावतीलच एका तरुणाने तीचा पाठलाग करुन तीला जवळील पिकात नेउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दि. 03.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 आणि पोक्सो कायदा कलम- 4, 6, 8, 12 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

येरमाळा  : माजलगाव, जि. बीड येथील अनिस लाला शेख हे दि. 03.03.2022 रोजी 01.30 वा. सु. नाथवाडी फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर ट्रॅक्टर क्र. एम.एच. 23 एएस 0825 व त्यास जोडलेले दोन ट्रेलर त्यांचे नोंदणी क्रमांक एम.एच. 13 जे 3055 व एम.एच. 13 जे 4985 हे चालवत जात होते. दरम्यान पाठीमागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनात आलेल्या तीन अनोळखी पुरुषांनी अनिस शेख यांचा नमूद ट्रॅक्टर- ट्रेलर अडवून अनिस यांसह त्यांच्या सहकाऱ्यास बोलेरो मध्ये बसवून 0530 वा. सु. येरमाळा घाटात सोडून त्यांना मारहान करुन त्यांच्या जळील दोन भ्रमणध्वनी, 2,000 ₹ रक्कम तसेच नमूद ट्रॅक्टर- ट्रेलर चोरुन नेला.  अशा मजकुराच्या अनिस शेख यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

येरमाळा  : येरमाळा पोलीसांनी दि. 03.03.2022 रोजी 19.45 वा. सु. सापनाई येथील ग्रामस्थ- बाबुराव भोस्कर यांच्या पत्रा शेडमध्ये जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन नमूद ठिकाणी छापा टाकला. यावेळी बाबुराव भोस्कर यांसह प्रविण बारकुल, अविष्कार बारकुल, दिपक पवार, तीघे रा. येरमाळा, नसरुद्दीन शेख, रा. दहीफळ, जयशंकर पौळ, रा. आळणी, बालाजी मुंडे, रा. वडगाव, रंगनाथ शिंदे, रा. शिंगोली, रमजान शेख हे सर्व तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य, 2 मोटारसायकल, 1 कार, 7 भ्रमणध्वनीसह 3,69,400 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.

यावर पथकाने जुगार साहित्यासह वाहने, भ्रमणध्वनी व रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web