उस्मानाबाद जिल्ह्यात चार अपघातात , सात ठार, सहा जखमी 

 
crime

नळदुर्ग  : बसवकल्याण, जि. बिदर, राज्य- कर्नाटक येथील- गणेश मादप्पा गुंडेमनी उर्फ ज्ञानेश्वर, वय 37 वर्षे व त्यांचा सहायक- महेश रामन्ना छपराशी, वय 25 वर्षे, रा. बसवकल्याण हे दोघे दि. 18.11.2022 रोजी 08.30 वा. सु. नळदुर्ग शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरुन ट्रक क्र. के.ए. 56- 3531 ने प्रवास करत होते. दरम्यान त्यांच्या ट्रकचे चाक पंक्चर झाल्याने ते दोघे पंक्चर काढत असताना अज्ञात चालकाने आयशर टेंम्पो क्र. एम.एच. 04 केयु 0469 हा निष्काळजीपने चालवल्याने नमूद दोघांना धडकला. या अपघातात गणेश व महेश हे दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मल्लीकार्जुन मादाप्पा गुंडेमनी, रा. बसवकल्याण यांनी दि. 18.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : कोराळ, ता. उमरगा येथील- प्रशांत कमलाकर स्वामी यांसह सदानंद गुरुपद स्वामी, वय 38 वर्षे हे दि. 12.11.2022 रोजी 18.00 वा. सु. उमरगा चौरस्ता ते लातुर रस्त्यावरील लक्ष्मी फाटा येथून चारचाकी वाहनाने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने स्कॉर्पिओ क्र. एम.एच. 12 एलव्ही 7500 ही निष्काळजीपने स्वामी यांच्या वाहनास समोरुन धडकली. या अपघातात सदानंद स्वामी हे मयत होउन प्रशांत हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या प्रशांत स्वामी यांनी दि. 18.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत आरळगुंडगी, ता. यडरामी, जि. कलबुर्गी येथील- सलीम महेबुब पटेल हे दि. 17.11.2022 रोजी 03.30 वा. सु. उमरगा येथील रस्ता वळणावर ट्रॅक्टर क्र. के.ए. 32 टीसी 1541 हा चालवत होते. यावेळी माणिक जगन्नाथ भुये, रा. बसवकल्याण यांनी कार क्र. के.ए. 56 एम 1663 ही निष्काळजीपने चालवल्याने नमूद ट्रॅक्टरला समोरुन धडकला. या अपघातात कारमधील चनवीर जगन्नाथ सोरडे हे मयत झाले. अशा मजकुराच्या सलीम महेबुब पटेल यांनी दि. 18.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंबी : दांडेगाव, ता. भुम येथील- विश्वास लहु भोगीले यांनी दि. 14.11.2022 रोजी 17.30 वा. सु. आनाळा येथील अंबी रस्त्यावर ट्रॅक्टर- ट्रेलर क्र. एम.एच. 25 एएस 6584 हा निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याबाजूने गुरे घेउन जात असलेले आनाळा ग्रामस्थ- शेषेराव शंकर क्षीरसागर, वय 65 वर्षे यांच्या अंगावर पलटला. या अपघातात शेषेराव यांसह दोन गाई गंभीर जखमी होउन मयत झाल्या. या अपघातानंतर नमूद चालक अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या- ज्योतीराम गोरख क्षीरसागर, रा. आनाळा यांनी दि. 18.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 429, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web