बेंबळीजवळ स्कॉरपिओची मोटारसायकलला धडक , एक ठार 

 
crime

बेंबळी : दि.06.12.2022 रोजी 13.30 वा चे सुमारास औसा ते तुळजापुर कडे जाणा-या रोडवरील आरणी पाटी जवळ महिंद्रा स्कॉरपिओ गाडी क्रं.एमएच 09 बीबी 2440 चे चालकाने त्याचे ताब्यातील गाडी रोडवर हयगयाने व निष्काळजीपणाने चालवुन रोडवरुन एम.एच.25 झेड 4733 या दुचाकी मोटारसायकलीस जोराची धडक मारुन दुचाकी चालक मधुकर जगताप यांना गंभीर जखमी करुन त्यांचे मृत्युस कारणीभुत झाला आहे. अशा मजकुराच्या सुनिल मारुती लोभे, रा. कानेगाव, ता.लोहारा यांनी दि. 07.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

 उस्मानाबाद  : येडशी येथील- महेद हाके हे दि. 07.12.2022 रोजी 15.30 वा. सु. येडशी येथील सरकारी दवाखाना कंपाउंड लगत कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1230 ₹ रक्कम बाळगलेले असताना उस्मानाबादर ग्रामीण पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web