उस्मानाबादेत न्यायाधीशांच्या बंगल्यातून चंदन चोरी 

 
azs

उस्मानाबाद  : पाच बंगला, न्यायाधीश निवासस्थान, उस्मानाबाद येथील परिसरातील अंदाजे 10,000 किंमतीची दोन चंदनाची झाडे अज्ञात व्यक्तीने दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री 01.00 ते 02.00 वा. सु. कापून चोरुन नेली होती. यावरुन पोलीस अंमलदार- योगेश बिराजदार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 257/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज दि. 03 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद उप विभागात गस्तीस असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पारधी विढी, वरुडा, ता. उस्मानाबाद येथील दादा संजय पवार, वय 24 वर्षे व एक अल्पवयीन बालक (विधी संघर्षग्रस्त बालक) हे दोघे नमूद गुन्ह्यातील चंदनाची झाडे बाळगुन आहेत. यावर पथकाने त्या दोघांना उस्मानाबाद ते तुळजापूर रस्त्यावर बेंबळी फाटा येथून 14.30 वा. सु. ताब्यात घेउन नमूद चोरीतील चंदनाच्या लाकडांसह चोरी करण्यास वापरलेली पल्सर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एव्ही 5350 ही जप्त केली असुन गुन्ह्यातील त्यांच्या तीसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

            सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व . अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि-रामेश्वर खनाळ, सपोनि-  मनोज निलंगेकर, पोहेकॉ- प्रकाश औताडे, जावेद काझी, धनंजय कवडे, पोना- शौकत पठाण, पोकॉ- बलदेव ठाकुर, वैशाली सोनवणे यांच्या पथकाने केली आहे. 

From around the web