आळणी टी पाईंट जवळ रोड रॉबरी / दरोडेखोरांनी मारहाण करून दागिने लुटले ... 

 
crime

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा दरोडेखोरांनी डोके वर काढले आहे. पाच ते सहा दरोडेखोरीनी उस्मानाबाद - ढोकी रोडवरील आळणी टी पाईंट जवळ ( फॉरेस्ट भाग ) एक Ertiga कार आडवून , त्यातील पाच  प्रवाश्याना लाकडाने बेदम मारहाण करून , अंगावरील दागिने लुटून पोबारा केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

सोमवारी पहाटे चार ते साडेचार वाजता उस्मानाबाद - ढोकी रस्त्यावर पाच ते सहा दरोडेखोरीनी रस्त्यावर जाणीवपूर्वक एक जॅक टाकला. या रस्त्यावरून जाणाऱ्या एका Ertiga कार  चालकाने तो जॅक पाहून कार थांबली असता, रस्त्याच्या कडेला झाडाआड लपून  बसलले दरोडेखोर कारजवळ आले आणि त्यांनी कारमध्ये बसलेल्या  पाच प्रवाश्याना घातक शस्त्राचा धाक दाखवून आणि लाकडाने बेदम मारहाण करून, पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भेट दिली.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तामरूल येथील काही प्रवासी लातूर - येडशी रस्त्याने उस्मानाबादकडे येत होते. त्यावेळी त्यांच्या जीपसमाेर चोरट्यांनी वाहनाच्या टुलबॉक्समधील जॅक फेकला. यामुळे जीपची गती कमी झाली. नंतर चार जणांनी वाहन अडवून आतील काहींना मारहाण केली. यामध्ये चालक अजय रमेश जाधव यांना अधिक मारहाण करण्यात आली. नंतर जीवे मारण्याची धमकी देऊन कारमधील इतर प्रवाशांची दागिने, मोबाईल व रोख रक्कम मिळून ८३ हजार रुपयांचा ऐवज लुटला.  घटनेनंतर चालक जाधव यांच्या फिर्यादीवरून उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश शिंदे करत आहत.

चोरीचे आणखी दोन गुन्हे दाखल 

उस्मानाबाद  : शिवसृष्टी नगर, उस्मानाबाद येथील- प्रेमचंद बजरंग मुंढे यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि.24.12.2022 रोजी 17.00 ते दि.26.12.2022 रोजी 12.00 वा.चे सुमारास तोडुन आतील गोदरेजच्या कपाटामधील अंदाजे 2,03,500 ₹ किंमतीचे सुमारे 45 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व चांदीचे 3 पैजणाचे जोड व 71,000 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रेमचंद मुंढे यांनी दि. 26.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद
: पळसवाडी, ता. उस्मानाबाद येथील- दर्शन बाबुराव कोळगे वय 45वर्षे  यांच्या शेतातील पत्रा शेडचे दाराला लावलेला पत्रा अज्ञात व्यक्तीने दि.25.12.2022 रोजी 23.00 ते दि. 26.12.2022 चे 06.00 वा. दरम्यान काढून आतील अंदाजे 2,07,900 ₹ किंमतीचे सुमारे 60 किलो वजनाचे 63 कट्टे सोयाबीन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या दर्शन कोळगे यांनी दि. 26.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web