लोकसेवकास धाकदपटशा करणाऱ्यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा

 
Osmanabad police

तुळजापूर  : लोकसेवकाच्या कर्तव्यास जाणीवपुर्वक अटकाव करण्याच्या उद्देशाने लोकसेवकास धक्काबुक्की केल्याबद्दल काक्रंबा, ता. तुळजापूर येथील आप्पाराव विठ्ठल माने उर्फ दाजी यांच्याविरुध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 15 / 2015 हा नोंदवण्यात आला होता. तत्कालीन पोउपनि- आर. ए. भंडारी यांनी तपासाअंती उस्मानाबाद येथील सत्र न्यायालयात खटला क्र. 84 / 2019 हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावनी प्रमुख जिल्हा व  सत्र न्यायाधीश मा. श्री. पेठकर यांच्या न्यायालयात होउन आज दि. 14.02.2022 रोजी आरोपी- माने यांस भा.दं.सं. कलम- 353 च्या उल्लंघनाबद्दल 2 वर्षे कारावासासह 500 ₹ दंडाची शिक्षा सुनावन्यात आली.

नुकसान

अंबी  : कार्ला, ता. परंडा येथील सोमनाथ विष्णु वरपे यांनी दि. 12.02.2022 रोजी 17.15 वा. सु. गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रे, संगणक इत्यादी साहित्य नष्ट करण्याच्या उद्देशाने त्या कार्यालयाच्या दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली. अशा मजकुराच्या ग्रामपंचायत सेवक- राजाराम जाधव यांनी दि. 13.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 436, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे
 

From around the web