लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेपसह आर्थिक दंडाची शिक्षा

 
crime

उमरगा   : आष्टाकासार, ता. लोहारा येथील- गणपती शंकर कागे, वय 38 वर्षे यांनी लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 376, 323, 504, 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा क्र. 93/2021 नोंदवण्यात येउन या गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा येथील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक. एस.बी. कवडे यांनी करुन तपासाअंती गुन्ह्याचे दोषारोपपत्र उमरगा सत्र न्यायालयात दाखल केले होते.

यात साक्षीदारांच्या साक्ष, परिस्थितीजन्य पुरावे तसेच शासकीय अभियोक्ते . एस.एम. देशपांडे यांच्या युक्तीवादातून या सत्र खटला क्र. 18/2021 ची सत्र न्यायालय, उमरगा येथे सुनावणी होउन आज दि. 30.11.2022 रोजी  सत्र न्यायाधीश  अनभुले यांनी उपरोक्त नमूद आरोपीस भा.दं.सं. कलम- 376, 323, 504, 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 6, 8, 12 च्या उल्लंघनाबद्दल जन्मठेप आणि 1,000 ₹ दंड व दंड न भरल्यास तीन हिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

हाणामारीचे दोन गुन्हे 

 मुरुम  : आलुर, ता. उमरगा येथील- स्वामीनाथ राठोड, सुनिल राठोड, काशीबाई राठोड, व्यंकठ राठोड, बाळु राठोड या सर्वांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 28.11.2022 रोजी 20.45 वा. सु. गावातील तलाठी कार्यालयाजवळ गावकरी- रमेश राठोड यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. यावेळी रमेश यांच्या बचावास त्यांचा मुलगा- रितेश व पत्नी हे पुढे सरसावले असता नमूद लोकांनी रितेश यांच्या डोक्यात दगड मारुन त्यांना जखमी करुन तसेच लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रितेश राठोड यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, 506 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
नळदुर्ग  : नळदुर्ग येथील- अजीम इनामदार, रजाक इनामदार, आयान इनामदार यांसह दोन अनोळखी व्यक्ती या सार्वांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 28.11.2022 रोजी 22.30 वा. सु. गावतील अक्कलकोट रस्त्यावर गावकरी- आयुब अब्दुलगणी शेख यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठीने मारहान करुन गंभीर जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच या दरम्यान नमूद लोकांनी आयुब यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम सुवर्ण साखळी हिसकावून व खिशातील 30,000 ₹ रोख रक्कम काढून घेतली. अशा मजकुराच्या आयुब शेख यांनी दि. 29.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web