तुळजापुरात लॉजवर वेश्याव्यवसाय ...  ३ महिला आणि ६ पुरुष ताब्यात ... 

 
crime

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे  तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापुरात काही लॉजवर वेश्याव्यवसाय सुरु आहे. तुळजापूर शहरातील वासुदेव गल्ली येथे काल रात्री (रविवारी) गुरु माऊली लॉज येथे पोलिसांनी छापा मारून वेश्याव्यवसाय करणाऱ्या ३ महिला आणि  ६ पुरुष अश्या ९ जणांना  ताब्यात घेण्यात आले आहे.  पोलिसांनी केलेल्या कारवाईत 5 मोबाइल, 5760 रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

 गुरु माऊली लॉज येथे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांच्या आदेशावरून आणि तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुमाऊली लॉजवर छापा मारला असता चालक आणि मॅनेजर संगनमताने वेश्याव्यवसाय सुरु असल्याचं समोर आलं. लॉजमध्ये गिऱ्हाईकाच्या मागणीप्रमाणे महिलांचा पुरवठा होत असल्याची माहिती मॅनेजरने पोलिसांनी दिली.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लॉज मालक संतोष मोहनराव यादव (रा.तुळजापूर), लॉज मॅनेजर श्यामराव रामकिसन फाळके (रा.परभणी) तसेच लॉजवर काम करणारा सुरज अनंत वीर (रा.तुळजापूर) तसंच ३ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला असे एकूण नऊ जणांवर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलम १९५६ चे कलम ३, ४, ५ सह भारतीय दंड संहिता कलम ३७०, ३७० (अ) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

From around the web