तुळजापुरात देवानंद रोचकरी विरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल
तुळजापूर : तुळजापूर येथील देवानंद साहेबराव रोचकरी यांनी त्यांच्या खंडीत अखंडीत अनाधिकृत विद्युत मीटरला छेडछाड करुन मार्च- 2019 ते 02 जुन 2022 या कालावधीत 7,17,330 ₹ किंमतीची एकुण 14,189 केडब्ल्यु भार विद्युत चोरी करुन ती एकुण 20 दुकानांना नमूद कालावधीत पुरवठा केल्याचे महावितरण उपविभाग, तुळजापूर यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन तुळजापूर उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता- संजय घोदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भारतिय विद्युत कायदा कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“
मुरुम : तुगाव, ता. उमरगा येथील विश्वास गणपतराव माने यांच्या गट क्र. 130 मधील शेतातील कडबा गंजीवरील झाकलेले 4×12 आकाराचे 4 लोखंडी पत्रे दि. 23- 24.05.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विश्वास माने यांनी दि. 09 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : शिवाजीनगर, उस्मानाबाद येथील प्रमोद उत्तम मोरे यांची महिंद्रा बोलेरो वाहन क्र. एम.एच. 25 ए 6484 हे दि. 06- 07 जून रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रमोद मोरे यांनी दि. 09 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.