तेरमध्ये चक्री ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 

तीन ठिकाणी सहा जण सापडले , मुद्देमाल जप्त 
 
crime

उस्मानाबाद  :  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आज दि. 30.11.2022 रोजी उस्मानाबाद तालूक्यात गस्तीस होते. दरम्यान पथक उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावात गेले असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की, तेर गावात तेर पेठ, बस स्थानकाजवळ व जवळच असलेल्या एका वस्तु संग्रहालयाजवळ अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार चालू आहे. 

यावर पथकाने सदर बाबत खात्री करुन स्था.गु.शा. चे पोनि-  यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करुन नमूद तीन्ही ठिकाणी छापे टाकले. यावेळी स्था.गु.शा. च्या एका पथकाने तेर येथील वस्तु संग्रहालयाजवळील एका शेडमध्ये 13.10 वा. सु. छापा टाकला असता तेथे तेर ग्रामस्थ- विजय बिभीषण नाईकवाडी व अक्षय बाळु सुरवसे हे दोघे चक्री ऑनलाईन जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह एक संगणक संच, एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 64,200 ₹ चा माल बाळगलेले आढळले. 

 दुसऱ्या पथकाने तेर बस स्थानकासमोरील एका पत्रा शेडमध्ये 13.15 वा. सु. छापा टाकला असता तेथे बुकनवाडी ग्रामस्थ- नवनाथ नानासाहेब शिंदे, नानासाहेब प्रकाश पिटले यांसह तेर ग्रामस्थ- चंद्रकांत विजय रसाळ हे तीघे चक्री ऑनलाईन जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह एक संगणक संच, एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 34,800 ₹ माल बाळगलेले आढळले.

 तीसऱ्या पथकाने तेर पेठ येथील एका पत्रा शेडमध्ये 13.30 वा. सु. छापा टाकला असता तेथे तेर ग्रामस्थ- सुकेश रतन माने हे चक्री ऑनलाईन जुगार चालवण्याच्या साहित्यासह एक संगणक संच, एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 49,020 ₹ चा माल बाळगलेले  आढळले. अशा प्रकारे पथकाने तीन ठिकाणच्या छाप्यातील जुगार साहित्यासह संगणक संच, मोबाईल फोन व रक्कम असा एकुण 1,48,020 ₹ चा माल जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

            सदरची कामगिरी .पोलीस अधीक्षक .अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक .नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि-  यशवंत जाधव, सपोनि- मनोज निलंगेकर, शैलेश पवार, पोउपनि- . संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- उलीउल्ला काझी, हुसेन सय्यद, विनोद जानराव, शौकत पठाण, इरफान पठाण, नितीन जाधवर, अमोल चव्हाण, बबन जाधवर, रविंद्र आरसेवाड, यांच्या पथकाने केली आहे.

From around the web