उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांकडून दहा हजार लाच घेताना पोलीस कर्मचारी चतुर्भुज 

 
lach

उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी पोलिसांकडूनच लाच घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका पोलिसांकडून दहा हजार रुपये लाच घेताना लिपिक एजाज अजीम शेख यास एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. 

 पोलिस कर्मचाऱ्याने बदली करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाने दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच घेताना यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक एजाज अजीम शेख, वय ४६ वर्षे, याने तक्रारदार कर्मचाऱ्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. यात विनयभंगाचीही तक्रार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उप अधिक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक हुलगे उस्मानाबाद यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 यातील तक्रारदार यांनी बदली साठी अर्ज केला असून सदर अलोसे याने वरिष्ठ लिपिक देसाई यांना सांगून  बदली करून देण्यासाठी 10,000/- रुपये लाच रक्कम यापूर्वी स्वीकारल्याचे मान्य करून तसेच सदर कामासाठी  लोकसेवक कनिष्ठ लिपिक यांनी दि.21/06/2022 रोजी 10,000/- रुपये लाचेची मागणी करून आज दि.22/06/2022 रोजी 10,000/- रुपये लाच रक्कम आलोसे एजाज अजीम शेख यांनी स्वतः पांचासमक्ष स्वीकारली आहे. तेसेच तु माझ्या मनात बसलीस,तु मला पहिल्याच दिवशी आवडली होतीस वगैरे म्हणून व हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत की, त्यांच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्यूरो, उस्मनाबाद02472222879 @टोल फ्री क्र.1064
 

From around the web