कसगीत जुगार अड्ड्यावर धाड टाकणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की 

 
crime

उमरगा  : उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 07 जून रोजी 15.30 वा. कसगी येथे जुगार चालवणाऱ्या तानाजी गुरव, लालू चिटकुटे यांच्यावर छापा टाकला होता. यानंतर पथक आरोपी- तानाजी गुरव यास सोबत घेउन वाहनातून पोलीस ठाण्याकडे परतू लागले असता संतोष गुरव याने त्याची मोटारसायकल पोलीस पथकाच्या वाहनासमोर आडवी लाउन पोलीसांचा रस्ता अडवला. तसेच ‘माझ्या मानसावर तुम्ही कारवाई का केली ? त्याला घेउन जाउ देणार नाही.’ असे पोलीस कॉन्स्टेबल- माधव बोईनवाड व सपोनि- कवडे यांना धमकावून, शिवीगाळ करुन त्यांना धक्काबुक्की केली. तसेच छाप्यात पोलीसांनी जप्त केलेले जुगार साहित्य हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावरुन माधव बोईनवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 332, 341, 353, 504, 506 सह जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : खडक, ता. तुळजापूर येथील मुरलीधर भंडारे यांचा गावातील विशाल सावंत यांसह इतरांशी गावातील फलक काढण्याच्या कारणावरुन जुना वाद आहे. या वादातून विशाल सावंत यांसह अन्य 17 पुरुषांनी दि. 07 जून रोजी 22.00 वा. सु. मुरलीधर यांसह त्यांचा भाऊ- किरण व भाऊबंद- नितीन, शाहु भंडारे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने काठ्या व धारदार शस्त्राने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या मुरलीधर यांनी दि. 08 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 149, 324, 307, 504, 506, सह ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web