पोलीस वाहनाची काच फोडली , नळदुर्गमध्ये एकावर गुन्हा दाखल 

 
crime

नळदुर्ग  : नळदुर्ग पो.ठा. चे पथक दि. 11 मे रोजी  रात्रगस्तीस असतांना 00.15 वा. सु. बसवेश्वर चौक, नळदुर्ग येथे एक पुरुष बसलेला आढळला. यावर पथकाने तेथे जाऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव- मल्लिनाथ महादेव बताले, रा. नळदुर्ग असे सांगीतले. पथकाने त्यास या अवेळी तेथे असण्याचे कारण विचारुन तसे मध्य रात्री न फिरण्यास बजावून तेथून जाण्यास सांगीतले. यावेळी  पोलीस शासकीय वाहनात बसून पुढे जावू लागताच बताले याने रस्त्यावरील काठी पोलीस वाहनाच्या पाठीमागील खिडकीवर मारुन खिडकीची काच फोडली. यावर पोलीस गाडीतून खाली उतरताच तो पळून गेला. यावरुन सपोफौ- राजकुमार बारकुल यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 427 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 दोन ठिकाणी चोरी 

उमरगा  : गवळीवाडा, उस्मानाबाद येथील बाळासाहेब बिट्टु गरड यांची होंडा लिओ मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एजी 0157 ही दि. 07 मे रोजी 16.30 ते 17.30 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या गरड यांनी दि. 10 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : चिरेवाडी, ता. उमरगा येथील व्यंकट वाघमोडे व प्रेमनाथ वाघमोडे हे दोघे पिता- पुत्र दि. 09 मे रोजी 17.00 वा. सु. गट क्र. 254 मधील आपल्या शेतात नांगरणी करण्यासाठी गेले होते. यावेळी गावकरी- शामराव बब्रुवान करे यांनी, “हे शेत माझे आहे ते तुम्ही नांगरणी करायची नाही.” असे धमकावून वाघमोडे पिता- पुत्रांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन मुका मार दिला. तसेच वाघमोडे यांनी मो.सा. क्र. एम.एच. 25 एटी 4960 ही पेटवून देउन आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या प्रेमनाथ यांनी दि. 10 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web