पोलीस रात्रगस्तीदरम्यान मोटारसायकलसह दोघे संशयीत ताब्यात 

 
crime

शिराढोण : शिराढोन पोलीस ठाण्याचे पथक दि. 25.02.2022 रोजी रात्री 01.45 वा. सु. रायगव्हाण येथे रात्रगस्तीस होते. यावेळी दोन तरुन एका मोटारसायकलसह रस्त्याबाजूस एका टपरीमागे अंधारात दबा धरुन बसलेले पथकास आढळल्याने पथकाने त्याना त्यांचे नाव- गाव विचारले असता त्यानी आपली नावे राम विष्णु जंगम, वय 20 वर्षे, रा. केाल्हेवस्ती, ता. केज व अक्षय सुनिल काळे, रा. टाकळी (घुले), ता. केज, जि. बीड असे सांगीतले. पथकाने त्यांच्या ताब्याती मोसाची पाहणी केली असता ती विना नोंदणीक्रमांकाची असून तीला किल्ली नसल्याचे आढळले. त्या मोसाच्या मालकी- ताबा विषयी ते दोघे पथकास समाधानकारक माहिती देत नसल्याने पथकाने त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात कटावनी, कटर, लोखंडी गज असे साहित्य मिळुन आले. यावर पथकाने त्या दोघांस मोसा व नमूद हत्यारांसह ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरीचे तीन गुन्हे 

उस्मानाबाद : भिमराव अंबरुषी घोळवे हे रात असलेल्या येडशी गट क्र. 838 मधील शेडचा पत्रा दि. 25.02.2022 रोजी 20.00 ते 21.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने उचकटून आतील पिठाच्या डब्यातील 39.5 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या भिमराव घोळवे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : खंडु दगडु शिरगिरे, रा. तेर, ता. उस्मानाबाद हे कसत असलेल्या तेर गट क्र. 130 मधील शेतातील तुषारसिंचन संचाचे 12 पाईप दि. 22- 23.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या खंडु शिरगिरे यांनी दि. 25.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : श्विाजीनगर, वाशी येथील गफार सत्तारमियाँ शेख यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 0493 ही दि. 24.02.2022 रोजी 16.30 ते 18.00 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या गफार शेख यांनी दि. 25.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web