मुरूम :  चोरीच्या वाळूसह ट्रक ताब्यात

 
Osmanabad police

मुरुम  : उमरगा उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने दि. 08.02.2022 रोजी 23.45 वा. कोथळी येथील मंदीरासमोर ट्रक क्र. के.ए. 53 सी 2112 हा संशयावरुन थांबवला असता त्या ट्रक मधील एक पुरुष लागलीच पसार झाला. त्या ट्रकमध्ये सुमारे 5 ब्रास वाळू वाहुन नेत असल्याचे पथकास आढळल्याने मध्यरात्री वाळु वाहतूक करण्याचे कारण, गौण खनिज स्वामित्व शुल्क इत्यादी विषयी ट्रक चालक- महंमद हनीफ अब्बासअली यांस विचारले असता ते समाधानकारक उत्तरे देत नसल्याने ती वाळू चोरीची असल्याचा संशय बळावला. यावरुन पोलीसांनी तो ट्रक जप्त करुन याप्रकरणी पोकॉ- माधव बोईनवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरीचे तीन गुन्हे दाखल 

तुळजापूर  : सावरगाव, ता. तुळजापूर येथील लंकेश राजेंद्र ढगे यांची हिरो स्प्लेंडर आयस्मार्ट मोटारसायकल क्र. एम.एच. 04 एचपी 9979 ही दि. 03- 04.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री कुंभारी येथील त्यांच्या मामाच्या घरासमोरुन चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या लंकेश ढगे यांनी दि. 09 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : कळंब येथील ग्रामस्थ- समर्थ अशोक पाटील यांच्या घराचा दरवाजा दि. 09.02.2022 रोजी 11.30 ते 14.00 वा. दरम्यान उघडा असल्याची संधी साधून घरातील एसीईआर कंपनीचे दोन लॅपटॉप अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या समर्थ पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : खानापुर शिवारातील बी.जे. पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्राच्या भुमीगत टाक्यांचे कुलूप दि. 09.02.2022 रोजी 01.00 ते 04.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडून 500 लि. डिझेल व 300 लि. पेट्रोल असे एकुण 76,500 ₹ किंमतीचे इंधन चोरुन नेले. अशा मजकुराच्या जुबेरपाशा सज्जादमियॉ जहागीरदार, रा. नळदुर्ग यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web