मुरुम : महिलेचा खून करणाऱ्या तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा
मुरुम : महिलेचा खून केल्या बद्दल मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 44 / 2012 नोंदवण्यात आला होता. त्यांचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक- श्री. निगदळे यांनी करुन उमरगा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला क्र. 24 /2013 चा निकाल आज दि. 04.02.2022 रोजी अति. सत्र न्यायाधीश मा. श्री. अनभुले यांच्या न्यायालयात जाहीर होउन आरोपी- बाबु बंदीछोडे यांसह त्यांची मुले मळाप्पा व दगडू अशा तीघांना भा.दं.सं. कलम- 302 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून आजन्म कारावासासह प्रत्येकी 500 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.
लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल
अंबी : परंडा सजाचे तलाठी चंद्रकांत कसाब यांसह पथकाने दि. 03.02.2022 रोजी 22.00 वा. सु. तांदुळवाडी येथील नदी-नाला पात्रात छापा टाकला असता ग्रामस्थ किरण व गणेश खरसडे हे दोघे ट्रॅक्टर- ट्रेलर मधून सुमारे दिड ब्रास वाळू चोरुन वाहुन नेत असल्याचे आढळले. यावेळी पथकाने कायदेशीर कारवाई सुरु केली असता नमूद दोघांनी, “आमचा ट्रॅक्टर पकडायचा नाही.” असे धमकावून, शिवीगाळ करुन पथकास धक्काबुक्की केली. यावरुन कसाब यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 379, 188, 504, 506, 34 तसेच महाराष्ट्र जमीन महसुल कायदा कलम- 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
,