परंडा : आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
crime

परंडा  : परंडा येथील- 1.नुरुद्दीन चौधरी 2.समीर पठाण 3.अजहर शेख 4.इस्माईल कुरेशी 5.जावेद पठाण 6.इरफान शेख 7.जमीर पठाण 8.बाशा शहाबर्फिवाले 9.रहेमतुल्ला पठाण 10.मुतर्जा साय्यद या सर्व लोकांनी जिल्हादंडाशिकारी, उस्मानाबाद यांचा जमावबंदी आदेश असतानाही त्या आदेशाचे उल्लंघन करुन दि. 02.10.2022 रोजी 11.00 वा. सु. तहसिल कार्यालय, परंडा येथे त्यांच्या मागण्यांसाठी बेकायदेशीर जमाव जमवला.

 तसेच दरम्यान त्यातील नुरुद्दीन चौधरी व समीर पठाण या दोघांनी स्वत:च्या अंगावर डिझेल ओतुन घेउन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावरुन परंडा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- रामराजे शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 309, 143 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 वाशी  : तांदुळवाडी, ता. वाशी येथील- सुशील रघुनाथ बोराडे व जगन्नाथ भिमराव गायकवाड या दोघांनी दि. 02.10.2022 रोजी 16.40 वा. सु. आठवडीबाजार, वाशी येथील सार्वजनिक रस्त्यावर अनुक्रमे ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 23 एक्स 0248 व विना नोंदणी क्रमांकाचा ॲपे रीक्षा ही वाहने रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द वाशी पोलीस ठाण्यात स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 

From around the web