परंडा : तीन गुन्ह्यातील चोरीच्या केबलसह दोन आरोपी ताब्यात

 
z

परंडा  : मंगळवार पेठ, परंडा येथील- श्रीराम एकनाथ चैतन्य यांच्या परंडा गट क्र. 51 मधील शेतातील 100 फुट केबल, स्टार्टर व ॲटोस्विच असे एकुण 6,500 ₹ चे साहित्य अज्ञात व्यक्तीने दि. 30.08.2022 रोजी 11.00 वा. ते दि. 01.09.2022 रोजी 11.00 वा. दरम्यान चोरुन नेले होते. यावरुन श्रीराम चैतन्य यांनी परंडा पोलीस ठाणे गाठून दि. 06.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा क्र. 263/2022 हा नोंदवला आहे.

            सदर गुन्हा तपासादरम्यान परंडा पोलीस ठाण्याच्या पोनि-  सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- . विक्रांत हिंगे, राजकुमार ससाणे, पोलीस अंमलदार- आण्णा भोसले, पांडुरंग गवळी, आफरोज शेख, संजय म्हेत्रे यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सांगवी, ता. उस्मानाबाद येथील सचिन भागवत गीरी, समाधान कमलाकर या दोघांना आज दि. 8 सप्टेंबर रोजी परंडा शहरातून ताब्यात घेउन त्यांच्या कडून चोरीचे एकुण 760 फुट केबल जप्त केले. 

सदर बाबत आरोपीतांकडे तपास केला असता त्यांनी नमूद गुन्ह्यातील 100 फुट केबल व अंबी पोलीस ठाणे हद्दीतील सोनारी शिवारातील दोन ठिकाणचे 660 फुट केबल दि. 06 सप्टेंबर रोजी चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी अंबी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 120, 212/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत. यावर पोलीसांनी त्या केबलसह गुन्हा करण्यास वापरलेली दुचाकी जप्त करुन त्या दोघांना अटक केले आहे

From around the web