उस्मानाबाद आगाराच्या बस चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण
बेंबळी : राज्य परिवहन महामंडळाचे वाहक- अश्विनी बनसोडे व चालक- सुदर्शन ओव्हाळ हे दि. 18 मे रोजी 20.00 वा. सु. एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 4237 ही उस्मानाबाद- बेंबळी- लोहारा असे घेउन जात होते. दरम्यान पाटोदा येथे बस थांबली असता आतील प्रवासी हरिदास संतु निलंगे, रा. पाटोदा हे बस मधून उतरत असताना त्यांनी बस सावकश न चालवल्याच्या कारणावरुन चालक- ओव्हाळ यांना शिवीगाळ केली.
यावर ओव्हाळ यांनी रस्ता खराब असल्याने बस आदळत असल्याचे हरिदास यांना सांगीतले असता हरिदास व त्यांची दोन मुले- समाधाव, प्रविण यांसह जिवन बसवंत गायकवाड यांनी चिडून जाउन ओव्हाळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहान करुन मुका मार दिला. यावेळी वाहक- बनसोडे यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता जिवन गायकवाड यांनी बनसोडे यांना शिवीगाळ केली तर प्रविण याने गर्दीचा फायदा घेउन बनसोडे यांच्या हातील प्रवाशांचे तिकीटाचे 3,610 ₹ रक्कम घेउन पसार झाला. यावरुन आश्विनी बनसोडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 294, 327, 332, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवलाआहे.