उस्मानाबाद :  विवाहास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या 

 
crime

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एक अनुसूचित जातीची तरुणी सन 2018 मध्ये 17 वर्षीय असल्यापासून एप्रील 2022 पर्यंत वेळोवेळी एका तरुणाने तीला विवाहाचे आमिष दाखवून तीच्याशी लैंगीक संबंध प्रस्थापित केले. कालांतराने तीने विवाहाचा आग्रह धरला असता त्या तरुणासह त्याच्या कुटूंबीयांनी विवाहास नकार देउन तीला शिवीगाळ करुन धमकावले. अशा रितीने त्याने तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्या 22 वर्षीय तरुणीने एप्रील 2022 मध्ये आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयत मुलीच्या बहिणीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 306 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : दत्तनगर, ढोकी येथील रफिक चाँदपाशा वस्ताद व त्यांची बहिण- गोरीबी हे दोघे दि. 06.04.2022 रोजी 14.45 वा. सु. गल्लीतील हौदावर पाणी भरत होते. यावेळी गावकरी- एजाज आलीम कुरेशी हे त्यांच्या म्हशीवर टाकत असलेले पाणी चाँदपाशा यांच्या घागरीत पडत असल्याने त्यांनी एजाज यांना हटकले. यावर वाद उद्भवून एजाज यांसह कुरेशी कुटूंबातील मुजफर, रशीद, मुबीन, आल्ताफ, शहाबाज, मुस्ताक, ईम्रान, ईरफान, आस्लम, ईकबाल, अस्मान, नासेर या सर्वांनी रफिक यांसह त्यांची बहिण- गोरीबी व पिता- चाँदपाशा मियाँ वस्ताद यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज, सत्तुराने मारहान करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या चाँदपाशा यांनी दि. 7 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 326, 147, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : केज, जि. बीड येथील संजय सोनवणे हे दि. 17 एप्रील रोजी 03.00 वा. येरमाळा बस स्थानकावर बीड बसची वाट पाहत असताना एका अनोळखी तरुणाने संजय यांच्या हातातील पिशवी हिसकावून पलायन केले. यावर संजय यांनी त्याचा येडशी उड्डानपुलापर्यत पाठलाग केला असता पुलालगतच्या शेतातील अंधारात असलेल्या त्या चोरट्याच्या अनोळखी तीन पुरुषा साथीदारांनी संजय यांना लोखंडी दांड्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या संजय यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल 

बेंबळी  : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, उस्मानाबाद आगाराचे बस चालक- हारुन सय्यद यांनी दि. 07 मे रोजी उस्मानाबाद बस स्थानकावर ग्राम -कनगरा मार्गावरील बस फलाटावर लावली होती. यावेळी एका मद्यधुंद पुरुषासह अन्य एका पुरुषाने बसच्या मार्गासंबंधी चौकशी करत हारुन यांच्याशी वाद घातला. त्यानंतर बस कनगरा येथे पोहचली असता त्या दोघांनी हारुन यांची गचांडी पकडून त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. यावरुन हारुन यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 34 अंतर्गत गुन्हा‍ नोंदवला आहे.

From around the web