उस्मानाबाद : चोरीच्या पाच  मोटारसायकलसह दोन आरोपी अटकेत

 
as

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात मोटारसायकली चोरून त्याची पुणे आणि इतर भागात विक्री करणाऱ्या दोन सराईत चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून पाच मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

शंकर खंडू पेटे ( वय 22 रा. वैराग रोड , उस्मानाबाद  सध्या रा. पुणे  ) आणि गणेश बबन लोंढे (वय 21 रा. हडपसर, पुणे ) अशी या चोरट्यांची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन  स्थानिक गुन्हे शाखाचे पथकाने दि.26.01.2023  रोजी उस्मानाबाद तालुक्यात मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्या कामी गस्तीस होते.गस्ती दरम्यान पथक उस्मानाबाद शहरात असतांना पथकास गोपणीय माहिती मिळाली की, वैराग रोड , उस्मानाबाद येथील शंकर खंडू पेठे  व गणेश बबन लोंढे दोघेही रा. मोहमदवाडी रोड पुणे हे दोघे एक चोरीची मोटर सायकल कोठेतरी विक्री करण्याच्या हेतुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात थांबून आहेत. 

यावर पथकाने लागलीच नमूद ठिकाणी धाव घेतली असता.संशयास्पद एका मोटारसायकल सह दोन पुरुष थांबलेले आढळले पथकाने त्यांची उपरेक्त प्रमाणे नाव गाव सागिंतले त्यांच्या कडे अधिक तपास केला असता त्यांच्या जवळील मोटरसायकल सह अशा  एकुण 5 मोटरसायकल  मिळून आल्या. तसेच सांगाडा व इंजीन क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास केला असता सदर मोटरसायकली चोरीस गेल्यावरून उस्मानाबाद जिल्ह्यातील आनंदनगर पो.ठा. गुरनं 28/2022 उस्मानाबाद शहर 41/2021 यासंह पुणे जिल्ह्यातील हाडपसर पो.ठा. गुरनं 1323/2022, वानवडी पोठा गुरन 256/2022 तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील एम.आय.डी.सी.वाळूज पो.ठा. 83/2022 कलम 379 अंतर्गत चोरीस गेल्यावरून नोंद असल्याचे समजले. यावर पथकाने त्या दोघांना ताब्यात घेऊन चोरीच्या 5 ही मोटरसायकल हस्तगत केल्या.तसेच पुणे पोलीस व औरंगाबाद पोलीस यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

➡️मिळाला  माल:-  वेगवेगळ्या कंपनीच्या 05  मोटार सायकल एकूण 1,30,000/-₹ चा
➡️1) पोस्टे आनंदनगर गुरन 28/2022 कलम 379 भा.द.वी
➡️2) पोस्टे उस्मानाबाद शहर गुरन 41/2021 कलम 379 भा.द.वी
➡️3) पोस्टे हडपसर, पुणे गुरन 1323/2022 कलम 379 भा.द.वी
➡️4) पोस्टे वानेवाडी जि.पुणे गुरन 256/2022 कलम 379 भा.द.वी
➡️5) पोस्टे MIDC वाळूज औरंगाबाद गुरन 83/2020 कलम 379 भा.द.वी

पोनि  यशवंत जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश पावर,पोहेका/ 1166 हुसेन सय्यद,पोना/1569  अमोल चव्हाण , पोना/1631  अशोक ढगारे
पोका/1819 रविंद्र आरसेवाड, पोहेका/1248 अरब यांनी ही कामगिरी बजावली.

https://fb.watch/ijG86UxUkB/

From around the web