उस्मानाबाद :  चोरीचे सहा मोबाईल फोन व रोख रकमेसह तीन आरोपी ताब्यात

 
z

उस्मानाबाद : पवारवाडी, ता. उस्मानाबाद येथील- जयपाल मुंढे हे दि. 28- 29.08.2022 रोजी आपल्या घरात कुटूंबीयांसह झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या जिन्यातून आत प्रवेश करुन आतील तीन मोबाईल फोन व 10,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली होती. अशा मजकुराच्या जयपाल मुंढे यांच्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गुन्हा क्र. 176/2022 हा भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उस्मानाबाद उपविभागात गस्तीस असतांना त्यांना गोपनीय खबर मिळाली की, 1)महादेव सोपान कोल्हे 2)छत्रपती देविदास कराड 3)उमेश महादेव ठोंबरे, तीघे रा. तांबवा, ता. केज, जि. बीड हे अनेक मोबाईल फोन बाळगून आहेत. यावरून पोलीसांनी  दि. 07 सप्टेंबर रोजी त्या दोघांना उस्मानाबाद शहरातून ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात नमूद चोरीतील रोख रक्कम व 3 मोबाईल फोनसह अन्य 3 मोबाईल फोन आढळल्याने ते मोबईल फोन जप्त करुन त्यांना त्याब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा च्या पोनि- रामेश्वर खनाळ, सपोनि-  शैलेश पवार, पोहेकॉ- विनोद जानराव, पोना- नितीन जाधवर, भालचंद्र काकडे, अजीत कवडे, महेबूब अरब यांच्या पथकाने केली आहे. 

From around the web