उमरगा तालुक्यात दोन अपघातात एक ठार, दोन जखमी 

 
crime

उमरगा  : मल्लीकार्जुन वस्ती, बलसूर, ता. उमरगा येथील बळीराम काशीनाथ साखरे हे 58 वर्षीय गृहस्थ दि. 23.05.2022 रोजी 08.45 वा. सु. मल्लीकार्जुन वस्ती येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 0218 ही चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने हायवा वाहन क्र. एम.एच. 25 एके 3459 हे निष्काळजीपने चुकीच्या दिशेने चालवल्याने बळीराम साखरे यांच्या मो.सा. ला धडकल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या शिवलींग बळीराम साखरे, रा. मल्लीकार्जुन वस्ती यांनी दि. 05 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या घटनेत नारंगवाडी, ता. उमरगा येथील अलका बालाजी मुळे या त्यांचा मुलगा- विष्णु यांसोबत दि. 04 जून रोजी 17.00 वा. सु. नारंगवाडी शिवारातील रस्त्याकडेला मो.सा. क्र. एम.एच. 24- 3170 सह थांबल्या होत्या. यावेळी अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 43 एबी 9583 ही निष्काळजीपने चुकीच्या दिशेने चालवल्याने मुळे यांच्या मो.सा. ला समोरुन धडकली. या अपघातात अलका यांसह त्यांचा मुलगा- विष्णु हे दोघे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या अलका मुळे यांनी दि. 05 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 लैंगिक अत्याचार

उस्मानाबाद  : एक तरुणाने गावातीलच 13 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे आमिष दाखवून दि. 03 जून रोजी 18.00 वा. सु. तीच्या राहत्या घरासमोरुन तीचे अपहरन केले. तसेच तीला परगावी आपल्या नातेवाईकाच्या घरी नेउन तीच्याव लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या आईने दि. 05 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 376 सह पोक्सो कायदा कलम- 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मालमत्ते विरुध्द गुन्हे

उस्मानाबाद : लासरा, ता. कळंब येथील राहुल संजय शेळके हे दि. 04- 05 जून दरम्यानच्या रात्री काजळा येथील राहूल आहेर यांच्या शेतात हारवेस्टरने ऊस पीक काढून झोपले असता दरम्यानच्या काळात त्यांच्या उशाचे विवो व सॅमसंग हे दोन स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या राहुल शेळके यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web