उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार , दोन जखमी 

 
crime

वाशी  : निरमणा, जि. आलवर, राज्य- राजस्थान येथील- निरंजन भवरलाल भाई, वय 51 वर्षे हे दि. 02.11.2022 रोजी 01.00 ते 01.30 वा. दरम्यान यसवंडी फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर कंटेनर क्र. आर.जे. 14 जीजी 2654 ही चालवत जात होते. दरम्यान पाठीमागून आलेल्या एका अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने निरंजन भाई यांच्या नमूद कंटेनरला पाठीमागून धडकला. या अपघातात निरंजन यांचा सहायक- प्रल्हाद सेन हे मयत होउन निरंजन भाई व छाजुसिंग हे दोघे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या निरंजन भाई यांनी दि. 03.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : आराधवाडी गल्ल, तुळजापूर येथील- महादेव आबाराव मोटे, वय 63 वर्षे हे दि. 02.11.2022 रोजी 13.30 वा. सु. आराधवाडी वाहन तळाजवळील रस्त्याने पायी जात होते. यावेळी अज्ञात चालकाने टँकर क्र. जी.जे. 16 एव्ही 3732 हा निष्काळजीपने चालवल्याने महादेव मोटे यांना पाठीमागून धडकल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या- विकास साहेबराव मोटे, रा. आराधवाडी, तुळजापूर यांनी दि. 03.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 कळंब  : गांधीनगर, कळंब येथील- शफीक अलीम मोमीन उर्फ सर्फराज, वय 35 वर्षे यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 56 (अ) (ब) अन्वये उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातुन एक वर्षाकरीता हद्दपार केले होते. असे असतानाही तो आदेश डावलण्याच्या उद्देशाने शफीक मोमीन हे विनापरवाना कळंब शहरात आले असल्याचे कळंब पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी त्यांना अटक करुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 142 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web