उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार, दोन जखमी
तुळजापूर : आपसिंगा, ता. तुळजापूर येथील नामदेव भागवत गादे यांसोबत बळीराम बलभीम जाधव, वय 38 वर्षे रा. बावी हे दि. 31.05.2022 रोजी 00.15 वा. सु. उस्मानाबाद- तुळजापूर महामार्गालगतच्या सुर्या ढाब्यासमोर रस्त्याच्याबाजूस पिकअप वाहनासह थांबले होते. यावेळी अज्ञात वाहनाच्या व अज्ञात चालकाच्या निष्काळजपने ते वाहन नामदेव यांच्या नमूद पिकअप वाहनाला पाठीमागून धडकले. या अपघातात बळीराम जाधव हे मयत होउन नामदेव गादे हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर त्या अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या नामदेव गादे यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : उमरगा येथील गजानन रविंद्र दंडगे, वय 36 वर्षे हे दि. 28.05.2022 रोजी 08.00 वा. सु. दाबका येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील उड्डान पुलाजवळील रस्त्याने मोटारसायकलने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 02 सीएल 7812 ही निष्काळजीपने चालवल्याने दंडगे यांच्या मो.सा. ला पाठीमागून दिलेल्या धडकेत दंडगे यांच्या कंबरेचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या गजानन दंडगे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.