उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार , दोन जखमी 

 
crime

वाशी  : राजुरी, ता. पंरडा येथील शिवाजी अण्णा गिरी, वय 38 वर्षे हे दि. 20 मे रोजी 15.30 वा. सु. यशवंडी फाटा येथील रस्त्याकडेला मोटारसायकलसह थांबले होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. एम.एच. 18 बी.जी. 9522 हा निष्काळजीपने चालवल्याने तीच्या समोरील वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्या बाजूस थांबलेले शिवाजी गिरी यांच्या अंगावरुन गेल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद ट्रकचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या तुकाराम परमेश्वर गिरी, रा. सरमकुंडी, ता. वाशी यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : एकुरगा, ता. उमरगा येथील बालाजी विठ्ठल जवळगे, वय 52 वर्षे व सुनिता हे दोघे पती- पत्नी दि. 25 मे रोजी 15.30 वा. सु. दाळींब येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरुन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयू 2694 ने प्रवास करत होते. दरम्यान रस्त्याबाजूस उभ्या असलेल्या कार क्र. एम.एच. 48 एवाय 2711 चे चालक- महेंद्र हिरालाल गुप्ता, रा. कळवा, ठाणे यांनी आजूबाजूस न पाहता कारचा दरवाजा अचानक उघडल्याने जवळगे पती- पत्नी प्रवास रकत असलेली मो.सा. त्या दरवाजास धडकल्याने ते दोघे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या बालाजी जवळगे यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web