उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार, दोन जखमी 

 
crime

लोहारा  : भातांगळी, ता. लोहारा येथील लक्ष्मण सोपान रक्टे, वय 37 वर्षे यांसोबत मोहन विश्वंभर जगताप, वय 68 वर्षे हे दि. 05 मे रोजी 18.45 वा. सु. गास्ती (बु.) शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 12 डीएफ 5581 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने ऑटो रीक्षा क्र. एम.एच. 25 एन 974 हा निष्काळजीपने चालवल्याने लक्ष्मण रक्टे चालवत असलेल्या नमूद मो.सा. पाठीमागून धडकली. या अपघातात मोहन जगताप हे मयत झाले तर लक्ष्मण रक्टे हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद रिक्षाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या लक्ष्मण रक्टे यांनी दि. 10 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : चालक- चंद्रकांत चौगुले, रा. बोरगाव, ता. उस्मानाबाद यांनी दि. 06 मे रोजी 18.00 वा. सु. गोरेवस्ती येथील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 8328 ही निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याकडेला थांबलेले- आगतराव श्रीमंत पोंदे, वय 46 वर्षे, रा. चिखली, ता. उस्मानाबाद यांना पाठीमागून धडकल्याने पोंदे यांच्या डाव्या पायाचे हाड मोडून पाठीला मुका मार लागला आहे. या अपघातानंतर नमूद चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या आगतराव पोंदे यांनी दि. 10 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web