उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात एक ठार , सहा जखमी
येरमाळा : येरमाळा येथील राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 22 मार्च रोजी 01.00 वा अज्ञात चालकाने ट्रक क्रमांक आर जे 11 बी 4937 हा त्याचे पोजीशन लाईट चालु न ठेवता उभा केला होता. अंधारात तो ट्रक पाठीमागुन येणा-या स्विफट कार क्रमांक एम एच 14 एफ जी 8677 चे चालक निखील जगताप यांना दिसला नाही. परीणामी स्विफट कार त्या ट्रकला पाठीमागुन वेगात धडकुन कार मधील वसीम शेख हे मयत होवुन अन्य चौघे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या निखल जगताप यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 304 अ , 338 व मोवाका 184 अंतर्गत् गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : बावी शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 25 मार्च रोजी 05.30 वा चालक-महेश गंगाप्पा रा.कर्नाटक राज्य यांनी कार क्रमांक के ए 3 एम एस 3768 ही निष्काळजीपणे चालवल्याने अनियंत्रीत होवुन समोरील उसाच्या ट्रेलरला धडकली. या अपघातात कार चालकासह कार मधील अन्य दोघे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या दिवाकर रेडडी कुटटीजी रा. कर्नाटक राज्ययांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279 , 338 व मोवाका 184 अंतर्गत् गुन्हा नोंदवला आहे.
भुम : ईट येथील गोलाई चौकाच्या पुढे परीसरात लोहारा ग्रामस्थ –महेश गरड यांनी बुलेट मोटार सायकल क्रमांक एम एच 16 बी एन 1020 ही निष्काळजीपणे चालवल्याने अनियंत्रीत होवुन समोरुन येणा-या म.रा.रा.प.म च्या बस क्रमांक एम एच 20 बी एल 1969 ला समोरुन धडकली. या अपघातात बससह त्या मोटार सायकलची मोडतोड होवुन आर्थीक नुकसान झाले. अशा मजकुराच्या बस चालक- संतोष लोंढे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279 , 427 अंतर्गत् गुन्हा नोंदवला आहे.