उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार, एक जखमी 

 
crime

तामलवाडी : खडकी, ता. तुळजापूर येथील- सोमनाथ उध्दव काळे यांसोबत वडजी, ता. सोलापूर (द.) येथील- फुलचंद धर्मा पवार, वय 63 हे दि. 18.11.2022 रोजी 15.30 वा. सु. इटकळ ते तुळजापूर रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एव्ही 2555 ने प्रवास करत होते. दरम्यान नांदुरी शिवारातील रस्त्यावर अज्ञात वाहनाने नमूद मो.सा. ला पाठीमागून धडक दिल्याने फुलचंद पवार हे मयत होउन सोमनाथ काळे हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या सोमनाथ काळे यांनी दि. 29.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : संभाजीनगर, उस्मानाबाद येथील- अदित्य पांडुरंग तनमोर, वय 21 वर्षे हे दि. 28.11.2022 रोजी 20.00 वा. पुर्वी आळणी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन मो.सा. क्र. एम.एच. 25 वाय 3379 ही चालवत जात होते. दरम्यान अज्ञात वाहनाने अदित्य यांच्या नमूद मो.सा. ला पाठीमागून दिलेल्या धडकेत अदित्य हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचे पिता- पांडुरंग तनमोर यांनी दि. 29.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web