उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार, एक जखमी 

 
crime

तुळजापूर  :  सिंदफळ ग्रामस्थ लक्ष्मण मिसाळ हे दिनांक 28 मार्च रोजी 18.45 वा सिंदफळ रस्त्याने पायी जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटार सायकल क्रमांक एम एच 13 ए जी 7189 ही निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवल्याने तीची धडक लक्ष्मण मिसाळ यांना लागुन ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तो अज्ञात मोटार सायकल चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या लक्षमण मिसाळ यांनी  वैद्यकिय उपचारा दरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 279,337,338 मो.वा.का कलम 134,184 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  :  भोगजी ग्रामस्थ  सुर्यकांत ढाकणे  हे दिनांक 7 एप्रील रोजी 20.40 वा सात्राफाटा येथील रस्त्याने पायी जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मह्रिद्रा मॅक्स वाहन क्रमांक एम एच 25 आर 2450 ही निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवल्याने तीची धडक सुर्यकांत यांना लागुन ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर तो अज्ञात वाहन चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाउ चंद्रकांत यांनी चौकशी दरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 279,337,338,304 अ मो.वा.का कलम 134,184 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

 
 रहदारीस धोका निर्माण करणा-यांवर दोन गुन्हे दाखल 

उमरगा :  उमरगा पोलीस दिनांक 10 एप्रील रोजी 14.00 वा उमरगा बस स्थानका समोरील रस्त्याने गस्त करत असतांना आळंद ग्रामस्थ –मसकअली नाईकवाडी व अमोल रेणुके यांनी आपापली क्रुझर वाहने अनुक्रमे के ए 29 एम 7326 व के ए 36 एम ए 2003 ही रहदारीस धोका निर्माण होईल अशा रितीने रस्त्यावर लावलेली आढळले. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 283 अंतर्गत  2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web