उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार, एक जखमी 

 
crime

ढोकी  : चालक- महेश बिभीषन कुऱ्हाडे, रा. आरणी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 20.02.2022 रोजी 09.30 वा. सु. गावातील सुंभा रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 14 डीयू 844 ही निष्काळजीपने चालवल्याने गावकरी- अभिषेक बालाजी अंबाडे यांना पाठीमागून धडकली. या अपघातात अभिषेक यांच्या उजव्या पायाचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या बालाजी बलभिम अंबाडे यांनी दि. 27.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : नागुलगाव, ता. कळंब येथील काकासाहेब भानुदास भोरे, वय 52 वर्षे यांनी दि. 28.01.2022 रोजी 08.30 वा. सु. भाटशिरपुरा गावातील पुलाजवळ मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 4237 ही निष्काळजीपने चालवल्याने अनियंत्रीत होउन घसरली. या अपघातात स्वत: काकासाहेब भोरे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- रविकांत काकासाहेब भोरे यांनी अनैसर्गीक मृत्यु च्या चौकशी दरम्यान दिलेल्या लेखी जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : बलसुर, ता. उमरगा येथील अरुण सतिश शिंदे हे दि. 27.02.2022 रोजी 14.30 वा. सु. आपल्या घरासमोरील अंगणात 20 लि. हातभट्टी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकास आढळले. तर मुळेगाव, ता. सोलापूर (द.) येथील दिनेश सुरेश जाधव हे याच दिवशी ईटकळ शिवारातील एका कुकूटपालन शेडजवळ 180 व 90 मि.ली. क्षमतेच्या देशी- विदेशी दारुच्या 11 बाटल्या आणि 35 लि. हातभट्टी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web