उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार , एक जखमी 

 
Osmanabad police

कळंब : कन्हेरवाडी, ता. कळंब येथील ग्रामस्थ- समाधान अशोक सावंत, वय 21 वर्षे व सिध्दार्थ प्रताप सावंत हे दोघे दि. 19.02.2022 रोजी 21.30 वा. सु. हासेगाव शिवारातील कळंब – येरमाळा रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 7358 ने प्रवास करत होते. यावेळी समाधान सावंत यांनी मोसा निष्काळजीपने चालवल्याने ती अनियंत्रीत होउन रस्त्याबाजूच्या चारीत जाउन धडकली. या अपघातात समाधान सावंत हे मयत झाले तर सिध्दार्थ सावंत हे जखमी झाले. अशा मजकुराच्या सिध्दार्थ सावंत यांनी दि. 20.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : संजयकुमार पटेल, रा. चौंदखेडा, जि. अहमदाबाद, राज्य- गुजरात हे दि. 19.02.2022 रोजी 12.00 वा. सु. तेरखेडा शिवारातील रस्त्याने टँकर क्र. जी.जे. 27 एक्स 6917 हे चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. एम.एच. 16 बीसी 3099 हा निष्काळजीपने चालवल्याने पटेल यांच्या टँकरला समोरुन धडकला. या अपघातात टँकरचे व ट्रकचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या संजयकुमार पटेल यांनी दि. 20.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web