नळदुर्गमध्ये ट्रॅक्टरचा धक्का एकाचा मृत्यू 

 
crime

नळदुर्ग  : किलज, ता. तुळजापूर येथील- गुंडू विश्वनाथ भोईटे, वय 50 वर्षे यांच्या होर्टी गट क्र. 47 मधील शेतात दि. 28.10.2022 रोजी 14.30 वा. सु. होर्टी ग्रामस्थ- रामेश्वर बळीराम बोरगावे हे आपल्या ट्रॅक्टरने शेत मशागत करत होते. यावेळी रामेश्वर बोरगावे यांनी ट्रॅक्टर निष्काळजीपने चालवल्याने ट्रॅक्टरच्या पाठीमागील रोटाव्हेटरचा धक्का शेतमालक गुंडु भोईटे यांना लागून ते रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- संतोष गुंडु भोईटे यांनी दि. 05.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा येथे हाणामारी 

 येरमाळा  : जावेद इनामदार, शत्रुघ्न किर्दत, दोघे रा. लोणारवाडी व कुमार तानवडे, सागर, दोघे रा. कौडगाव या चौघांनी दि. 30.10.2022 रोजी 12.00 वा. सु. उपळाई येथील ओमसाई हॉटेल येथे जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन उपळाई ग्रामस्थ- दिपक शिवाजी तांबडे यांसह त्यांचा भाऊ- अजित यांना लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच त्या चौघांनी नमूद दोघा तांबडे बंधूंना स्विफ्ट कार क्र. एम.एच. 03 एफ 2763 मध्ये बळजबरीने बसवून वालवड शिवारात नेउन तेथे लोखंडी गजाने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या दिपक तांबडे यांनी दि. 05.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 324, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web