लोहारा येथे जुन्या आर्थिक व्यवहारातून एकाचा खून 

 
crime

लोहारा  : लोहारा येथील- प्रल्हाद गुंडु घोडके यांनी जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 06.11.2022 रोजी 08.30 वा. सु. गावातील जिजाउ मेमोरियल स्कुल जवळील रस्त्यावर गावकरी- शंकर व्यंकट कल्यामुळे, वय 25 वर्षे यांना उचलुन रोडवर आपटुन त्यांना जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या मयताचा चुलत भाऊ- सखाराम चंद्रकांत कल्यामुळे, रा. लोहारा यांनी दि. 06.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 उस्मानाबाद : सार्वजनिक ठिकाणी हॉटेलसमोर शेगडीवर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करणे, बेदरकारपणे वाहन चालवने व सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणे अशा प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 06.11.2022 रोजी खालील प्रमाणे 8 कारवाया केल्या.

 
1) अंबी पोलीस ठाणे : सोनारी, ता. परंडा येथील- रंगनाथ शिरसट, गणेश देवकर व अंबी येथील- बिभीषण शेजाळ तर जेजला येथील- हरी भोसले या चौघांनी आपापल्या गावातील आपापल्या हॉटेलसमोरील शेगडीत निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. तर हिंगणगाव येथील- लक्ष्मण जोगदंड यांनी आपल्या ताब्यातील पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 पी 3771 हे गावातील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.

2) तामलवाडी पोलीस ठाणे : सोलापूर येथील- दिनकर पाटील व तामलवाडी येथील- तानाजी घोटकर या दोघांनी तामलवाडी टोल नाका येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 13 सीटी 2318 व मो.सा. क्र. एम.एच. 08 एक्स 874 ही वाहने भरधाव वेगात निष्काळजीपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले.

3) वाशी पोलीस ठाणे : दासमेगाव येथील- फुलचंद पवार यांनी वाशी येथील पारा चौकात आपल्या ताब्यातील रीक्षा क्र. एम.एच. 44 ए 831 हा रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.   यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

 

From around the web