उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात एक ठार, चार जखमी 

 
crime

उमरगा : गुंजोटी ग्रामस्थ- निलेश पतंगे  हे दिनांक 29 मार्च रोजी 19.30 वा गावातील हिरव्या कारखान्यासमोरुन पायी जात होते. यावेळी गावकरी –खंडु कटके याने नोंदणी क्रमांक नसलेली डिसकव्हर मोटार सायकल निष्काळजीपणे चालवल्याने ती अनियंत्रीत होउन पतंगे यांना धडकली. या अपघातात पतंगे यांच्या चेह-यावर गंभीर जखमा झाल्या.  अपघाता नंतर चालक कटके हे जखमीस वैद्यकिय उपचाराची तजवीज न करता तसेच नजीकच्या पोलीस ठाण्यास अपघाताची खबर न देता  घटनास्थळा वरुन वाहनासह पसार झाला.अशा मजकुराच्या निलेश पतंगे यांनी दि. 30 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 338,सह  मोवाका 134, 184 अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : मंगरुळ ता.तुळजापूर ग्रामस्थ खंडु लबडे हे दिनांक 27 मार्च रोजी 22.15 वा गावकरी-रमेश खपडे यास मोटार सायकलवर सोबत घेउन काक्रंबा गावातुन जात होते. यावेळी जुन्या टोलनाका परीसरात पाठीमागुन आलेली  कार क्रमांक एम एच 26 ए के 8228 ही लबडे यांच्या मोटार सायकलला पाठीमागुन धडकली. या अपघातात मोटार सायकल स्वार - लबडे व खपडे या दोघांना गंभीर जखमा झाल्या.  अपघाता नंतर नमुद कारचा अज्ञात चालक जखमींस वैद्यकिय उपचाराची तजवीज न करता तसेच नजीकच्या पोलीस ठाण्यास अपघाताची खबर न देता  घटनास्थळा वरुन वाहनासह पसार झाला.अशा मजकुराच्या लबडे यांनी दि. 30 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 338,सह  मोवाका 134, 184 अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : कोठाळवाडी ता.कळंब ग्रामस्थ अर्जुन शिंदे हे  दिनांक 27 मार्च रोजी 22.00 वा ट्रॅक्टर क्रमांक एम एच 25  ए एल 2489 वर बसुन जात होते. या वेळी ढोकी येथील महावितरण कार्यालया समोरील रस्त्यावर त्या ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकाने धावत्या ट्रॅक्टरचे निष्काळजीपणे अचानक ब्रेक लावल्याने शिंदे हे ट्रॅक्टरवरुन खाली पडुन त्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरचे चाक त्यांच्या शरीरावरुन गेल्याने गंभीर जखमी होउन  मयत झाले.अशा मजकुराची पत्नी  नागरबाई यांनी दि. 30 मार्च रोजी अपघाताच्या  चौकशीत दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 304 अ अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web