उस्मानाबाद जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी चार अपघातात एक ठार, चार जखमी
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील विक्रम महादेव देशमुख यांच्या सोबत गावसुद ग्रामस्थ- विजय अंबादास सगर हे दि. 28.01.2022 रोजी 20.30 वा. सु. बेगडा – पोहनेर रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25- 1638 वरुन प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एस 2844 ही निष्काळजीपने चालवल्याने विक्रम देशमुख चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला समोरुन धडकली. या अपघातात विक्रम यांसह विजय सगर हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या विक्रम देशमुख यांनी दि. 02.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : इंदिरानगर, नळदुर्ग येथील नरसिंग रामसिंग शिरुरे, वय 42 वर्षे हे दि. 01.02.2022 रोजी 13.20 वा. सु. नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील आलीयाबाद पुलाजवळ मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एव्ही 0137 ही चालवत जात होते. यावेळी वाहन क्र. एम.एच. 13 आर 4351 ने नरसिंग यांच्या मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- नागेश शिरुरे यांनी दि. 02.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील नितीन बालाजी राउत, वय 28 वर्षे हे दि. 30.01.2022 रोजी 21.15 वा. सु. करंजकर इस्पीतळासमोरील रस्त्याने मोटारसयकल क्र. एम.एच. 25 एयु 5313 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 9462 ही निष्काळजीपने चालवल्याने नितीन यांच्या मो.सा. ला समोरुन धडकली. या अपघातात नितीन राउत यांच्या उजव्या पायाचे व उजव्या हाताच्या बोटाचे हाड मोडून गुडघ्यास मुका मार लागला आहे. अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या नितीन राउत यांनी दि. 02.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : पुणे येथील खुदबुद्दीन पाशा तांबोळी यांनी दि. 02.02.2022 रोजी 17.00 वा. सु. मस्सा (खं.) शिवारातील रस्त्यावर कार क्र. एम.एच. 12 क्युटी 2613 ही निष्काळजीपने चुकीच्या दिशेने चालवल्याने समोरुन येणाऱ्या मोटारसायकल क्र. 25 एएम 6551 ला धडकली. या अपघतात मो.सा. चालक- प्रसन्न कुमार लकापुती, वय 27 वर्षे, रा. मोटथकुरु, जि. कुर्नूल, राज्य- आंध्रप्रदेश यांच्या गुडघ्याचे हाड मोडून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या प्रसन्न लकापुती यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.