उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात एक ठार, पाच जखमी 

 
crime

वाशी  : गोजवाडा येथ्ज्ञील विश्वनाथ दगडु बोबडे यांनी दि. 12 मे रोजी 12.30 वा. सु. पारधीपिढी, दसमेगाव येथील रस्त्यावर ऑटो रीक्षा क्र. एम.एच. 47 ई 9623 हा निष्काळजीपने चालवल्याने पिंपळगाव (लिं.) येथील कुमार मंचक सुकाळे, गणेश हदीचंद्र सुकाळे, प्रदिप महादेव सुकाळे हे तीघे प्रवास करत असलेल्या मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एस 3835 ला समोरुन धडकला. या अपघातात मो.सा. चालक- कुमार सुकाळे हे मयत होउन गणेश व प्रदिप हे जखमी झाले. अशा मजकुराच्या परमेश्वर कुंडलीक सुकाळे, रा. पिंपळगाव (लि.) यांनी दि. 13 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ), 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : सोलापूर येथील प्रितम पांडुरंग कांबळे, वय 30 वर्षे हे दि. 11 मे रोजी 18.45 वा. सु. हंगरगा शिवारातील लातुर- सोलापूर पर्यायी रस्त्याने स्कुटर क्र. एम.एच. 13 डीएस 1145 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 24 एएफ 8881 ही निष्काळजीपने चालवल्याने प्रितम यांच्या स्कुटरला पाठीमागून धडकल्याने या अपघातात ते हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या प्रितम कांबळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत अज्ञात चालाकने दि. 12 मे रोजी 14.00 वा. सु. तुळजापूर येथील सोलापूर रस्त्यावर स्कॉर्पिओ क्र. एम.एच. 06 बीयु 1793 ही निष्काळजीपने चालवल्याने सिंदफळ, ता. तुळजापूर येथील संदिप बापु धनके, वय 32 वर्षे हे चालवत असलेल्या मोटारसायकलला समोरुन धडकल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या संदिप धनके यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 

From around the web