उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात एक ठार, पाच जखमी 

 
crime

कळंब  : पिंपळगाव (को.), ता. वाशी येथील अनंत महादेव लाड, वय 35 वर्षे हे दि. 26.02.2022 रोजी 11.00 वा. सु. खोंदला गावातील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने वाहन क्र. एम.एच. 12 क्युटी 3657 हे निष्काळजीपने चालवल्याने लाड यांच्या मोसाला पाठीमागून धडकल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या ज्ञानोबा बापुराव लाड, रा. पिंपळगाव (को.) यांनी दि. 28.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

ढोकी  : तडवळा (कसबे), ता. उस्मानाबाद येथील तानाजी आप्पा काळे, वय 42 वर्षे हे दि. 05.02.2022 रोजी 19.30 वा. सु. गावातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 3361 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएस 2375 हा निष्काळजीपने चालवल्याने तानाजी काळे यांच्या मोसाला समोरुन धडकला. या अपघातात तानाजी यांच्या डाव्या खांद्यास, छातीस व कानाला मार लागून ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद ट्रॅक्टरचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या तानाजी काळे यांनी दि. 28.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : चालक- सतिष आश्रुबा पारडे, रा. इंदापूर, ता. वाशी यांनी दि. 09.02.2022 रोजी 10.30 वा. सु. वडगांव फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर क्रुझर वाहन क्र. एम.एच. 25 आर 6891 हे निष्काळजीपने चालवल्याने समोरील ऊस वाहून नेनाऱ्या ट्रॅक्टर- ट्रेलरला पाठीमागून धडकले. या अपघातात क्रुझर मधील शरद गपाट, शिवाजी जाधव, शिवाजी शिंगाडे यांसह स्वत: सतिष पारडे हे सर्व जखमी झाले. अशा मजकुराच्या शरद गपाट यांनी दि. 28.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या 8 चालकांवर गुन्हे दाखल

मुरुम  : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्या 8 चालकांवर मुरुम पोलीसांनी काल दि. 28.02.2022 रोजी कारवाया केल्या. यात रविराज गोंधळी, दिपक जाधव या दोघांनी मुरुम मोड येथील महामार्गावर, जनार्धन बिराजदार व प्रशांत माने या दोघांनी येणेगुर येथील महामार्गावर तसेच मुसा मासुलदार व इब्राहीम बागवान यांनी मुरुम येथील सार्वजनिक रस्त्यावर आणि गुरुलिंगय्या स्वामी यांनी सुंदरवाडी फाटा येथील सार्वजनिक रस्त्यावर व मुकेश इगवे यांनी उमरगा येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील ऑटो रीक्षे रहदारीस धोकादायकरित्या उभे केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 8 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 8 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web