एका शेतकऱ्याचा पीक विमा दुसऱ्याने उचलला, गुन्हा दाखल 

 
crime

नळदुर्ग  : बाभळगाव, ता. तुळजापूर येथील- चंद्रकांत दत्तात्रय धनवडे यांच्या शेत गट क्र. 38/2 मधील 3 हेक्टर 61 आर क्षेत्राचा 2020 सालचा पिक विमा चंद्रकांत यांची आई- उमाबाई धनवडे यांच्या नावावर भरला होता. परंतू ग्रामस्थ- प्रगती बळीराम धनवडे यांनी नमूद क्षेत्रात त्यांची शेती जमीन नसताना त्यांनी सप्टेंबर- 2020 ते जानेवारी 2022 दरम्यान कागदपत्रात फेरफार करुन त्या शेत जमिनीचा स्वत:च्या नावावर पिकविमा भरुन उमाबाई धनवडे यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या चंद्रकांत धनवडे यांनी दि. 13.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 471 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हयगईने मृत्युस कारणीभुत होणाऱ्यावर गुन्हा नोंद

ढोकी : शेताच्या तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाह सोडल्याने जीवीत हानी होण्याची शक्यता असल्याचे माहित असुनसुध्दा बुक्कनवाडी, ता. उस्मानाबाद येथील- सुर्यकांत गलांडे यांनी बुक्कनवाडी शिवारातील त्यांच्या शेताच्या तारेच्या कुंपनात विद्युत प्रवास सोडल्याने दि. दि. 13.12.2022 रोजी 09.00 वा. सु. गावकरी- बालाजी अनिल शिंदे हा 16 वर्षीय मुलगा त्या कुंपनाच्या तारेस चिकटून विद्युत धक्क्याने मयत झाला. अशा मजकुराच्या मयताचे पिता- अनिल लगमन शिंदे यांनी दि. 13.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web