अवैध सावकारीस कंटाळून सावरगावात एकाची आत्महत्या

 
Osmanabad police

तामलवाडी  : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ग्रामस्थ- विठ्ठल हणुमंत वायकर, वय 28 वर्षे यांनी तुळजापूर येथील शशी कदम यांच्याकडून कर्जाउ स्वरुपात एक वर्षापुर्वी दोन लाख रक्कम घेतली होती. त्या रकमेचे व्याज मागील चार महिन्यांपासून विठ्ठल वायकर हे देत नसल्याच्या कारणावरुन शशी कदम यांसह त्यांचे आई- वडील अशा तीघांनी विठ्ठल यांच्याकडे तगादा लावला होता.

 यातूनच दि. 29.01.2022 रोजी नमूद कदम कुटूंबीयांनी विठ्ठल यांना पैसे न दिल्यास तुळजापूरात नेउन धींड काढण्याची धमकी फोनद्वारे देउन व विठ्ठल यांच्या घरी जाउन त्यांच्या कुटूंबीयांस धमकावले होते. या त्रासास कंटाळून विठ्ठल वायकर यांनी दि. 29- 30.01.2022 दरम्यान विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या विठ्ठल यांची आई- कुसुम हणुमंत वायकर यांनी दि. 02.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 504, 506, 34 सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम- 39, 45 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

वाशी  : सरमकुंटी, ता. वाशी येथील भागवत देवराव काळे, वय 60 वर्षे हे आपल्या कुटूंबीयांसह दि. 01.02.2022 रोजी 17.30 वा. सु. आपल्या घरात होते. यावेळी गावकरी- असलम माणिक तांबोळी, सद्दाम तांबोळी, मुजाईत असलम तांबोळी, जेरीना तांबोळी या चौघांनी भागवत काळे यांच्या घरात घूसून जुन्या वादाच्या कारणावरुन भागवत यांसह त्यांची पत्नी व दोन मुले यांना जातीवाचक शिवीगाळ करुन दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच काळे यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुवर्ण दागिने व कपाटातील 1,20,000 ₹ रक्कम घेउन गेले. अशा मजकुराच्या भागवत काळे यांनी दि. 02.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 325, 324, 323, 504, 506, 427, 34 सह ॲट्रॉसिटी कायदाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web