कळंब तालुक्यात आर्थिक व्यवहारावरून वृद्धाचा खून 

 
crime

शिराढोण  :देवधानोरा,ता. कळंब येथील- पवन रामभाउ वटाणे यांनी जुन्या आर्थीक व्यवहाराच्या कारणावरून दि.27.12.2022 रोजी 10.00 वा  व 19.00 वा.सु. गावकरी बाजीराव पांडूरंग बोंदर, वय- 65 वर्ष यांना गंभीर मारहाण केल्यास ते मरण पावतील याची जाणीव असताना ही बाजीराव यांच्या घरासमोर छातीवर,पोटावर,जोर जोरात मारहाण केली.यात बाजीराव यांना रक्ताची उलटी होउन ते मरण पावले.अशा मजकुराच्या पांडुरंग बोदंर यांनी दि.29.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं.कलम- 304,504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघातात दोन ठार 

मुरूम : बेळंब, ता.उमरगा येथील-धनराजसुर्यकांत तुगावे यांनी दि. 25.12.2022 रोजी 18.00वा. सु.मुरूम शिवारातील हंगरगेकर यांचे शेता जवळ रस्त्यावर ट्रक्टर हेड क्र एम.एच.25 ए.डब्ल्यु. 5003 हा चुकिच्या दिशेने निष्काळजीपने चालवल्याने जीप क्र एम.एच.13 एफ 9920 यांना समोरून धडकल्याने जीप चालक शिवराज कुपेंद्र बिराजदार रा. बेळंब, ता.उमरगा व इतर लोक गंभीर जखमी होउन अलीझा चॉद पेटीवाले वय दिड वर्ष,जैबुन बशीर शेख वय 40 वर्ष हे मयत झाले.अशा मजकुराच्या चालक- शिवराज बिराजदार यांनी दि. 29.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279,337,338, 304 (अ), सह मो.वा.का. कलम-184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web