उस्मानाबादेत दोन तोतया पोलिसांकडून वृद्धाची फसवणूक 

 
crime

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात तोतया पोलिसांचा सुळसुळाट वाढला आहे. शहरात तोतया पोलिसांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले असताना पोलीस डोळ्यावर काळी पट्टी बांधून बसले आहेत.शहरातील एका ७५ वर्षीय वृद्धाला दोन तोतया पोलिसांनी फसववल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 

यातील प्रथम खबरी- अनंत खुळे हे उस्मानाबाद येथील हिरो शोरुमच्या मागील रस्त्याने आपल्या घराकउे पायी चालत जात होते. दरम्यान समोरुन आलेल्या एका मोटारसायकलवरील तोंडास मास्क लावलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी खुळे यांना थांबवून, “मी पोलीस असून रात्रीच एक चोरीचे प्रकरण झाले आहे. आणि अशात तुम्ही अंगावर सोने का घालता, ते काढून हातरुमालात बांधून ठेवा.” असे खुळे यांना बतावणी केली.

 यावर खुळे हे आपल्या अंगावरील 15 ग्रॅम वजनाची सुवर्ण  साखळी व 5 ग्रॅम वजनाची सुवर्ण अंगठी असे एकुण अंदाजे 60,000 ₹ किंमतीचे दागिने आपल्या हातरुमालात बांधत असताना त्या दोन भामट्यांनी आपल्या हाताने बांधून देण्याचा बहाणाकरुन रुमालातील ते दागिने हातचलाखीने काढून घेतले. यानंतर खुळे हे तेथून आपल्या घरी परतले असता त्यांनी रुमाल सोडून पाहिल्यावर त्यांना आपले दागिने दिसून आले नाहीत. अशा मजकुराच्या अनंत खुळे यांच्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

From around the web