रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हा 

 
crime

उस्मानाबाद  : किसान चौक, मुरूम येथील- राहूल रनधीर फुगाटे, तर औराद,ता.उमरगा येथील- प्रदिप जमादार या दोघांनी दि.12.01.2023 रोजी 12.15 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲटो रिक्षा. क्र.एम.एच. 02 ‍व्हि.ए. 1399 व ॲपे रिक्षा. क्र.एम.एच. 23 एस 6923 हे उमरगा येथील राष्ट्रीय महामार्गावर  रहदारीस धोकादायरीत्या उभे केले असताना उमरगा पोलीसांना आढळले. तर करजखेडा, ता.उस्मानाबाद येथील- मिथुन सहदेव चौरे  यांनी याच दिवशी 10.00 वा. सु. आपल्या ताब्यातील महिंद्रा सुमो. क्र.एम.एच. 12 जी.‍व्हि. 9747 ही करजखेडा ते तुळजापुर चौरस्ता येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केले असताना बेंबळी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे  गुन्हे नोंदवले आहेत.

 
निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल

बेंबळी   : ताकविकी, ता. उस्मानाबाद येथील- याशीन महेबुब मलंग व ककासपुर, ता. उस्मानाबाद येथील- भास्कर विश्वनाथ कांबळे हे दोघे दि. 12.01.2023 रोजी 12.00 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ट्रॅव्हल्स क्रं. एम.एच.04 एफ.के. 1064 व ट्रॅव्हल्स क्रं. एम.एच. 14 बी.ए. 8401 ही वाहने करजखेडा ते तुळजापुर चौरस्ता येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना बेबंळी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे  दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web