नंदगाव : शेतजमीन मालकीच्या कारणावरुन हाणामारी 

 
crime

नळदुर्ग : नंदगाव, ता. तुळजापूर येथील प्रदिप राम मोरे हे दि. 24 मे रोजी 08.00 वा. सु. गट क्र. 572 मधील शेत नांगरणीसाठी गेले होते. यावेळी भाऊबंद- विकास शंकर मोरे, प्रितम शंकर मोरे यांनी शेतजमीन मालकीच्या कारणावरुन प्रदिप यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लाकडी बॅटने मारहान करुन प्रदिप यांना जखमी केले व शेतात परत आल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रदिप मोरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : प्राथमिक आरोग्य केंद्र, येणेगूर येथील वैद्यकीय अधिकारी- डॉ. सुहास प्रतापराव साळुंके हे दि. 23 मे रोजी 17.40 वा. सु. आरोग्य केंद्रात कर्तव्यावर होते. यावेळी प्रविण राठोड व शिवाजी जाधव, दोघे रा. नळदुर्ग यांसह एक नोळखी पुरुष यांनी सुहास साळुंके यांच्या कार्यालयात जाउन कार्यालयीन कामकाजासंबंधी साळुंके यांच्याशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ व मारहान करुन साळुंके यांच्या गळ्यातील सुवर्ण साखळी ओढून घेउन ठार मारण्याची धमकी देउन त्यांच्या टेबलावरील काच व एमएलसी रजीस्टर फेकून दिले. यावरुन डॉ. सुहास साळुंके यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 327, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            याच प्रकरणात डॉ- सुहास साळुंके व रुग्णवाहीका चालक- शेख व अनिल स्वामी यांनी दि. 23 मे रोजी 15.30 वा. सु. नळदुर्ग येथील प्रविण चंदु राठोड यांना येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावून घेतले. यावेळी वृत्तपत्रात बातमी देउन बदनामी केल्याच्या रागातून नमूद तीघांनी प्रविण राठोड यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लाकडाने मारहान करुन जखमी केले. तसेच प्रविण यांच्या खिशातील पाच हजार रक्कम काढून घेउन यापुढे दवाखान्याची बातमी छापल्यास ठार मारण्याची धमकी प्रविण यांना दिली. अशा मजकुराच्या प्रविण राठोड यांनी दि. 24 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web