नळदुर्ग : दोन आरोपींच्या ताब्यातून गांजा जप्त

 
crime

नळदुर्ग  : गणेश गोरख ननवरे, रा. दहीवडी, ता. माढा, जि. सोलापूर व तुषार दत्तात्रय काकडे, रा. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे हे दोघे दि. 26.04.2022 रोजी 12.25 वा. सु. फुलवाडी टोलनाक्यापुढे एका हुंदाई एक्सेंट कार क्र. एम.एच. 12 एनबी 2629 मध्ये गांजा या अंमली पदार्थाची पाने, फुले, बीया असलेल्या एकुण 47 पुडक्यांत एकुण 102.915 क्रि.ग्रॅ. वजनाचा गांजा अवैधरित्या वाहून नेत असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले. यावर पथकाने सदर घटनेची माहिती तुळजापूर उपविभागाच्या पोलीस अधिकारी श्रीमती सई भोरे-पाटील यांना देउन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पो.ठा. चे सपोनि- श्री गोरे यांसह पथकाने नमूद गांजा या अंमली पदार्थासह वाहतूकीस वापरलेली हुंदाई कार जप्त केली आहे. यावर नळदुर्ग पो.ठा. चे पोलीस अंमलदार- लक्ष्मण शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन ननवरे व काकडे या दोघांविरुध्द गुन्हा क्र. 130/2022 हा एनडीपीएस ॲक्ट कलम- 20 अंतर्गत दि. 26 एप्रील रोजी नोंदवण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि- श्री गोरे हे करत आहेत.

  जुगार विरोधी कारवाई 

            जुगार विरोधी कारवाई दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकाने दि. 26.04.2022 रोजी 15.30 वा. सु. दाळींब गावात छापा मारला. यावेळी ग्रामस्थ- दिलीप कुंभार, ईब्राहीम शेख हे दोघे कल्याण मटका जुगार साहित्यासह 4,490 ₹ रक्कम बाळगलेले असाताना पथकास आढळले. तर तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने साप्ताहिक बाजार परिसर, तुळजापूर येथे छापा मारला असता उस्मानाबाद ग्रामस्थ- दिनेश थोरबोले, अविनाश महामुनी, संजय पेंटे हे तीघे टायगर मटका जुगार साहित्यासह 1,550 ₹ रक्कम बाळगलेले पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनुक्रमे मुरुम व तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web