नळदुर्ग : दीड हजार लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज 

 
lach d

उस्मानाबाद - दोन हजाराच्या लाचेची मागणी करून दीड हजार लाच घेताना नळदुर्गचे  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भीमा रघुनाथ गायकवाड यांना  एसीबी पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहेत. 


 याबाबत माहिती अशी की, तक्रारदार या वकील असून त्यांनी पोलीस स्टेशन नळदुर्ग गु. र. न. 88/2022 गुन्ह्यातील आरोपीतास कोर्ट कामकाजात मदत केली होती , सदर आरोपीतास न्यायालय तुळजापूर यांनी  न्यायालयीन कोठडी मंजूर केल्याने आरोपींना कारागृहात दाखल करण्यापूर्वी लोकसेवक गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर आरोपीस जेवण  देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी पंचांसमक्ष 2000 रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती 1500 रु लाच रक्कम स्विकारल्याने सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

या सापळा पथकात - पोअ/  मधुकर जाधव, अर्जुन मारकड, सचिन शेवाळे, सिद्धेश्वर तावसकर ,विष्णु बेळे , विशाल डोके, जाकीर काझी , नागेश शेरकर ला.प्र.वि, उस्मानाबाद.यांनी काम पाहिले.

From around the web