नळदुर्ग :  लोकसेवकास धाक दाखवणा-यावर गुन्हा दाखल

 
crime

नळदुर्ग - महावितरणचे पथक थकबाकी  वसुलीस सलगरा-दिवटी येथे दिनांक 14 मार्च रोजी 11.15 वा कार्य करत होते. यावेळी गावकरी नितीन लोमटे यांनी विज  देयक थकबाकीच्या वादातुन महावितरण पथकातील वरिष्ठ तत्रंज्ञ -वाल्मीक कांबळे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन लोकसेवकाच्या कर्तव्यात जाणीव पुर्वक प्रतिबंध केला.अशा मजकुराच्या वाल्मीक कांबळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 353, 323, 504, 506अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अतिक्रमण

कळंब -  खेरडा येथील मिनाक्षी व विनायक लोकरे या पती-पत्नी यांनी गावातील वस्त्ी विस्तार वाढ योजना भुखंड क्रमांक 128 व 136 मध्ये  सन 2011 पासुन सिमेंटचे घर बांधुन अतिक्रमण केले असुन अतिक्रमण काढण्याची वारंवार  सुचना देउनही त्यांनी अतिक्रमण काढलेले नाही. यावरुन मंडळ अधिकारी तुळशीराम मटके यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं 447, 188, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण

येरमाळा   : बाभ्ळगाव येथील सुभाष वाघमारे हे दिनांक 13 मार्च रोजी 10.00 वा शेतात पिकास पाणी देत होते. यावेळी भाउ -महादेव व भावजय –उज्ज्वला यांनी पिकास पाणी देण्याच्या वादातुन सुभाष यांना शिवीगाळ व धक्का बुक्की करुन दगड फेकुन मारला. यात सुभाष यांच्या डोक्यास जखम झाली. अशा मजकुराच्या सुभाष यांनी  दिलेलया प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324,504,506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web