नळदुर्ग पोलिसांचा अवैध मद्य विरोधी छापा, मुद्देमाल जप्त 

 
s

नळदुर्ग  : नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथक आज दि. 03 सप्टेंबर रोजी पोलीस ठाणे हद्दीत अवैध मद्य विरोधी कारवाई करीता गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, नळदुर्ग येथील टेलरनगर ते खानापुर रस्त्यालगत सतिश चव्हाण यांच्या शेतामध्ये एक ईसम अवैध रित्या मद्य बाळगुन आहे. यावर पथकाने नमूद ठिकाणी 04.00 वा. सु. छापा टकाला असता टेलरनगर, ईटकळ ग्रामस्थ- मरगु महादेव करे हे चव्हाण यांच्या शेतातील मेंढपाळ पालासमोर 8 खोक्यांत 180 मि.ली. क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकुण 384 सिलबंद बाटल्या असा एकुण 61,440 ₹ किंमतीचा दारु साठा बाळगलेले आढळले. 

यावर पथकाने नमूद ठिकाणचा मद्य साठा जप्त करुन मरगु करे यांच्याविरुध्द नळदुर्ग पो.ठा. येथे 289/2022 हा महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत नोंदवला आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पो.ठा. च्या सपोनि-  सिध्देश्वर गोरे, पोलीस अंमलदार- शिंदे, मुळे यांच्या पथकाने केली आहे.  

From around the web