नळदुर्ग : चोरीचे चार गुन्हे उघडकीस
उस्मानाबाद : गवळी गल्ली, नळदुर्ग येथील- सुनिल माणिकराव गव्हाणे यांनी त्यांच्या घर आवारातील पाणी टाकीवर ठेवलेली अंदाजे 1,500 ₹ किंमतीची लक्ष्मी कंपनीची 1 अश्वशक्ती क्षमतेची विद्युत मोटार दि. 16.10.2022 रोजी 22.00 ते दि. 17.10.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. अशा मजकुराच्या सुनिल गव्हाणे यांनी दि. 18.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत नळदुर्ग रिसॉर्ट येथे पाणी महलजवळील मोकळ्या जागेतील 13 फुटी लोखंडी अँगल प्रत्येकी 1,000 ₹ किंमत असेले असे एकुण 20 अँगल दि. 16.10.2022 रोजी 19.00 ते. दि. 17.10.2022 रोजी 07.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या रिसॉर्ट येथील कर्मचारी- निखील ज्योतीबा येडगे, रा. नळदुर्ग यांनी दि. 18.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उपरोक्त दोन्ही गुन्ह्यांच्या कार्यपध्दतीचा स्था.गु.शा. च्या पोनि-. यशवंत जाधव यांच्या पथकाने अभ्यास करुन 1) रोहण दिलीप शिंदे, रा. नळदुर्ग 2) कैलास शिवाजी साळुंके, रा. अणदुर यांना आज दि. 19.10.2022 रोजी नळदुर्ग शिवारातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता उपरोक्त दोन्ही गुन्ह्यांतील चोरीचा माल त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला. या सोबतच नळदुर्ग पो.ठा. गुन्हा क्र. 335, 336 /2022 हे चोरीचे गुन्हेही त्या दोघांनीच केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- मनोज निलंगेकर, . शैलेश पवार, . मोटे, पोलीस अंमलदार- उलीउल्ला काझी, प्रकाश औताडे, शौकत पठाण, योगेश कोळी, धनंजय कवडे, मस्के यांच्या पथकाने केली आहे.