मुरूम : रात्रगस्तीदरम्यान पोलीसांना दोन पुरुष संशयीतरित्या आढळले

 
crime

मुरुम : मुरुम पोलीस ठाण्याचे पथक दि. 29 जुलै रोजी 00.30 ते 01.30  वा. दरम्यान हद्दीतील दाळींग गावात रात्रगस्तीस असताना गावातील एका फर्टीलायझर्स दुकानाच्या आडोशाला व एसबीआय बँकेच्या एटीएमच्या बाजुस अशा दोन ठिकाणी दोन पुरुष अंधाराचा दबा धरुन बसलेले पथकास आढळले.

 पथकाने त्या दोघांची विचारपुस केली असता त्यांची नावे- आकाश संजय चव्हाण व राहुल रामदास चव्हाण, दोघे रा. हंगरगा (नळ) तांडा, ता. तुळजापूर असे समजले. अशा अवेळी त्या ठिकाणी उपस्थित असण्याबाबत विचारणा केली असता ते पथकास समाधानकारक उत्तरे देत नसल्याने ते दोघे माला विषयीचे गुन्हे करण्याच्या उद्देशाने तेथे दबा धरुन बसले असल्याचा पथकाचा संशय बळावल्याने त्या दोघांना ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द मुरुम पो.ठा. येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 122 (क) अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 ढोकी : ढोकी पो.ठा. चे पथक दि. 29 जुलै रोजी 21.45 वा. सु. हद्दीतील गोरेवाडी शिवारात गस्तीस होते. यावेळी गोरेवाडी ग्रामस्थ- पांडुरंग दिनकर संगर हे गावातील रस्त्यावर चारचाकी वाहन क्र. एम.एच. 12 एचव्ही 7438 हे मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मोटार वाहन कायदा कलम- 185 अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web